*सहभागी वाचन*
*उद्दिष्टे*
१)मुलांना गोष्टीचा आनंद मिळणे.
२) लिहिलेल्या भाषेची वैशिष्ट्ये व स्वरूप लक्षात येणे.
३) ओघवते वाचन कसे करावे हे समजणे.
४) लेखी मजकुराची जाण विकसित करून देणे.
५) विराम चिन्ह यांचे वाचन तसेच परिचय होणे.
पुस्तक कोणते निवडावे–
१) भरपूर चित्र व कमी मजकूर असणारे
२) पुस्तक आकाराने मोठे असणारे.
३) शब्दांची पुनरावृत्ती होणारे पुस्तके निवडावे.
४)मुलांच्या भावविश्वाशी संबंधित किंवा मुलांचे अनुभव शिक्षकांनी लिहिलेले असेल तर ते पुस्तक वापरावे.
*सहभागी वाचन कसे करावे ते पाहूया*-=
*दिवस पहिला-*
पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवा आणि सांगावे आज मी तुम्हाला या पुस्तकातून एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. मुखपृष्ठावरील चित्र दाखवून चित्र पहा आणि विचारा कशाबद्दल गोष्ट असेल? मुलं जी उत्तरे देतील ती उत्तरे स्वीकारावे मुलांची उत्तरे देण्याचा अंदाज ऐकून घ्यावा.
नंतर पुस्तकाचे एकेक पान पलटत आतील चित्रांवरून मुलांना गोष्टीचा अंदाज करता येतो का ते पहावे मुलांना चित्रावर प्रश्न विचारावे पुढे काय झालं असेल? काय होईल? असे करत संपूर्ण पुस्तकात उलगडून दाखवा.सगळे पुस्तक दाखवा झाली की मग फक्त दाखवा आता मी तुम्हाला लिहिलेली गोष्ट वाचून दाखवणार आहे आणि गोष्टीचे नाव सांगा.
आता गोष्ट वाचताना वाक्यातील प्रत्येक शब्दावर बोट ठेवले व वाचतांना आवाजात योग्य तो चढ-उतार योग्य जागी विराम घेत वाचन करावे आणि मध्ये एखाद्या दुसरे काही प्रश्न सुद्धा विचार आहे प्रश्न विचारताना एक काळजी अशी घ्यावी ही गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याचा तास होता कामा नये. पहिल्या दिवशी मी जे पुस्तक सहभागी वाचण्यासाठी निवडणार आहे त्यातील मुख्य घटनांचे चित्र व त्याखाली त्या घटना ठळक व मोठ्या अक्षरात लिहिलेले असाव्यात.शेवटी त्या चित्रांच्या घटनाक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने लावून घ्यावा व त्याखाली लिहिलेले वाचावे.
*दिवस दुसरा-*
आपण काल जी गोष्ट वाचली ती गोष्ट मी तुम्हाला आज परत वाचून दाखवणार आहे आणि बोट ठेवून गोष्ट योग्य स्वराघातासह वाचून दाखवा. गोष्ट वाचून दाखवताना मध्ये मध्ये अंदाज घ्यावा जे ध्वनिदर्शक किंवा पुनरावृत्ती असलेले शब्द आहेत ते मुले वाचतात का या गोष्टीचा अंदाज घ्यावा वाजत असल्यास त्याठिकाणी थांबून त्यांना वाचून घ्यावे व अशा पद्धतीने संपूर्ण गोष्ट वाचून घ्यावी. शेवटी आवाजाचे किंवा पुनरावृत्ती असणारे शब्द वेगळे लिहावे व मुलांना विचारून पहावे ही मुले सांगतात का आणि काही प्रसंगावर मुलांसोबत चर्चा करावी.
*दिवस तिसरा-*
*उद्दिष्ट-मुलांना पुस्तकाचे लेखक व चित्रकार माहिती होणे.*
*चित्रांत संदर्भ घेऊन वाचता येणे.*
तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना मुखपृष्ठ दाखवून विचारावे ही गोष्ट कोणी लिहिली? या गोष्टीचे लेखक कोण आहे?
चित्रकार कोण आहे?
मुलांनी दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घेऊन गोष्ट वाचायला सुरुवात करावी आता आपण वाचून दाखवत असताना मुले सोबत वाचतात का याचासुद्धा अंदाज घ्यावा. मुले जर वाचत असतील तर त्यांना वाचून देत आपण सुद्धा वाचा याठिकाणी अप्रत्यक्षरीत्या विरामचिन्हांची ओळख व वाचन सुद्धा सांगावे आणि लक्षात आणून द्यावे मध्येच एखाद्या ठिकाणी थांबून तिथे काय लिहिले ते विचारावे आणि अंदाज घ्यावा या पद्धतीने गोष्ट वाचून दाखवावी.
*दिवस 4-*
*उद्दिष्ट-चित्रातील बारकावे लक्षात आणून देणे*.
चौथ्या दिवसाची सुरुवात करताना पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ दाखवावे आणि मुखपृष्ठ व मलपृष्ठ कशाला म्हणतात हे सुद्धा सांगावे चित्रकाराचे नाव काय लेखकाचे नाव काय याचा अंदाज घ्यावा आणि पुस्तक वाचत असतांना चित्रं व विशेष करून चर्चा घ्या चित्रात काय दिसते यावरून गोष्टीचा अंदाज व गोष्ट काय लिहिले चित्र तीन पात्रांविषयी सुद्धा बोलावे आणि परत एकदा संपूर्ण गोष्ट वाचून दाखवा आणि चित्र वाचत असताना मुलांच्या सांगण्यामध्ये कुठे काय सुटले ते गोष्ट वाचत असताना त्यांना सांगावे.
*दिवस पाचवा-*
*उद्दिष्ट-गोष्टीतील मुख्य घटनांचा घटनाक्रम सांगणे.*
पाचव्या दिवशी गोष्टीतील प्रमुख टप्पे म्हणजेच मुख्य घटना त्यांचे चित्र काढा तयार ठेवावे त्याखाली मोठ्या अक्षरात मजकूर लिहिलेला असावा आणि त्या घटनांचा क्रम मुलांकडून लावून घ्यावा कोणत्या घटनेनंतर कोणती घटना घडली असेल याचा अंदाज मुलांकडून करून घ्यावा आणि मुले अंदाज करत त्या घटनांचा क्रम लावतील त्याखाली काय मजकूर लिहिला असेल ते विचारावे आणि आपण सुद्धा तो मजबूत मोठ्या आवाजात वाचून दाखवावा.
तसेच या टप्प्यात आणखी एक महत्त्वाची कृती म्हणजेच फळ्यावर गोष्टीतील एखादे वाक्य लिहावे आणि त्यातील एखादा शब्द गाळून मुलांना आपल्याजवळील शब्द टाकून ते वाक्य वाचण्यास सांगा जसे
मला भाकरी खायला आवडते.
या वाक्यात भाकरी हा शब्द गाळून मुलांना आणखी काय काय आवडते ते शब्द घालून हे वाक्य वाचून घ्यावे.
*दिवस सहावा-*
आपण गेले पाच दिवस एका पुस्तकावर बराचसा सराव घेतला आहे आता सहाव्या दिवशी मुलांना हे पुस्तक हाताळायला द्यावे दोघा दोघांमध्ये एक पुस्तक द्यावे आणि त्याच्या सोबत बसून निरीक्षण करावे बहुतेक मुले ही पुस्तके आपल्यासारखे वाचण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी आरती त्या ठिकाणी आपण मदत करावी.
*सहभागी वाचन साक्षरतेच्या या सुरुवातीच्या टप्प्यावर एकच गोष्ट परत परत वाचणे गरजेचे असते कारण मुलांना एकच गोष्ट परत परत वाचायला आवडते परंतु पुढे काही कालावधीनंतर पुस्तक बदलून गोष्टी वाचून दाखवावे. आरंभिक साक्षरतेत महत्वाची भूमिका सहभागी वाचनाची आहे कारण मुलांनी पऱ्यांच्या गोष्टी ह्या थोरामोठ्यांचा कडून ऐकलेल्या असतात परंतु त्यांना याची जाणीव नसते की आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या गोष्टी कुठेतरी लिहिलेले असतात आणि ज्या गोष्टी आपण बोलतो त्या लिहिल्या जातात आणि जे लिहिले जाते ते वाचले सुद्धा जाते याची जाणीव सुद्धा सहभागी वाचनातून मुलांमध्ये निर्माण होते. वाचन समृद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी वर्गामध्ये मुलांच्या वयोगटाला अनुरूप असे गोष्टींची पुस्तके उपलब्ध असणे गरजेचे आहे सुरुवातीच्या काळामध्ये मुलांना चित्र जास्त आणि मजकूर कमी अशा स्वरूपाची पुस्तके असणे गरजेचे आहे तसेच सहभागी वाचन करत असताना बऱ्याच मोठ्या टप्प्यावर आपण गेलो असलो तरी सुद्धा या प्रमुख उद्दिष्ट मुलांना केवळ या गोष्टीतून आनंद मिळणे हेच असावे तसेच प्रत्येक मुलाने आपण सांगत असलेली गोष्ट ऐकली पाहिजे असा अट्टाहास सुद्धा शिक्षकाने करू नये व गोष्टी निवडत असताना मुलांचा वयोगट लक्षात घेऊन तसेच मुले किती वेळ एका ठिकाणी बसू शकतात हेसुद्धा शिक्षकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.आरंभिक साक्षरतेच्या काळामध्ये सहभागी वाचनाची कृती ही वरील प्रमाणे झाल्यास मूल वाचनाकडे खूप लवकर येते असे शास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात आले आहे. म्हणून इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये रोज किमान एक गोष्ट ही वाचून दाखवली पाहिजे असे केल्यास आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले ही वाचण्यासाठी तयार होतील.*
* संकलन*
*देविदास गजानन गोसावी*
*विषय सहाय्यक मराठी*
*DIECPD बुलडाणा*
*सौजन्य – QUEST*