अक्षर गटाकडून लिपी परिचय

अक्षर गटाकडून लिपी परिचय
सर्वसाधारणपणे आपण पहिलीत मुले आले की प्रारंभीचे वाचन लेखन शिकण्यासाठी वर्णमाला शिकवण्यास सुरुवात आणि एकच अक्षर फक्त होण्यासाठी तेच अक्षर दहा-दहा वेळा लिहिण्यास सांगतात किंवा अक्षर शिकवताना अक्षरांची सांगड शब्दांची घालतो. जसे की क कमळाचा, व वजनाचा अशा पद्धतीने आणि अशी सांगड मुलांची एकदा पक्की झाली की अनोळखी शब्द वाचताना मुलं त्यातील एकेक अक्षर त्यांच्या मनातील शब्दांची सांगड घालत वाचता त्यामुळे दिलेला शब्द कळणं मुलाला अवघड जाते.आणि वाचन हे अर्थ विहीन होते या दोन्ही प्रक्रिया वाचन शिकण्यातल्या प्रमुख अडचणी आहे काही ठिकाणी मुलांना धडे वाचून दाखवल्या कालांतराने तेसुद्धा मुलांचे पाठवता व अशा वेळीसुद्धा धड्या बाहेरचे मुले वाचू शकत नाही म्हणजे ही सुद्धा वाचनातील एक मोठी अडचण आहे.
म्हणूनच आपण आता लिपी परिचय करून देताना एका वेगळ्या पद्धती कडे म्हणजेच अक्षर गट वापरून लिपी परिचय पर्यंत कसे जाता येईल व अर्थासहित एक असे वाटते त्यासाठी आपण पद्धत समजून घेऊया वाचन शिकवत असताना खालील टप्प्यानुसार आपण जाऊया
१) अक्षरांचे गट
२) अक्षर परिचयाची तंत्रे
३) अक्षराचे दृढीकरण
४) शब्दचक्र
वरील टप्प्यानुसार आपण एकही पायरी न वगळता गेल्यास आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले हे वाचकापर्यंत येतात ते कसे आपण पाहूया.
१) अक्षरांचे गट-
आपला पारंपारिक गट
क,ख,ग,घ,च,तर,जी,झ
वरील प्रमाणे जर घेतला तर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील? किती वाक्य तयार होतील?
तर याचे उत्तर अत्यल्प कारण यात स्वर नाही आणि मर्यादा सुद्धा भरपूर आहे
म्हणून वर्णमालेच्या क्रमाने अक्षरे शिकवल्यास वरील गटापासून मुलांना समजतील असे पुरेसे अर्थपूर्ण शब्द
बनत नाही आणि ह्याच क्रमाने गेल्यासं संपूर्ण लिपी परिचय होईपर्यंत मुले अर्थपूर्ण वाचनाकडे वळू शकत नाही.
आता आपण अक्षरांच्या क्रमात बदल करून हे वेगळा अक्षर गट घेऊन पाहूया
म,क,त,न,झ,घ,ह ा
आता ह्या गटा पासून बनणारे शब्द माझा, कान हात मामा काका झाक इत्यादी. तसेच वाक्य माझा हात, माझा काका, माझा मामा.इ
म्हणजेच ह्या अक्षर गटातून आपल्याला काय दिसते? काय लक्षात येते? तर मुलांच्या भावविश्वात आणि त्यांच्या संबंधित शब्द वाक्य अधिक प्रमाणात तयार होतात आणि मुलांच्या भावविश्वातील त्यांच्या परिचयातील आणि स्वतःच्या संबंधित शब्दांपासून वाचनाचा प्रारंभ केल्यास वाचन मुलांना खूप सोपं जातं आणि या गटापासून अधिकाधिक अर्थपूर्ण शब्द तयार होतात आपण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने सुद्धा अक्षर गट तयार करू शकतो फक्त काळजी एवढेच घ्यायची की अक्षर गट तयार करत असताना मुलांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द कसे तयार होते हे लक्षात घ्यावे. म्हणजेच आदिवासी भागांमध्ये किंवा मराठी पेक्षा वेगळी बोली असलेल्या भागात त्या पद्धतीचा अक्षर गट तयार होईल.
२) अक्षर परिचयाची तंत्रे
आपण अक्षर गट कसा तयार होतो हे बघितले आता अक्षराच्या परिचय कडे जाऊया अक्षय परिचय ची पहिली पायरी म्हणजे ‘आवाजाचा खेळ’
काय आहे आवाजाचा खेळ तर आपल्या अक्षर गटातील पहिल्या अक्षर आपण घेऊ या ‘म’ म सुरुवातीला एक ध्वनी म्हणून आपण पाहूया . म हा आवाज असणारे धोनी असणारे शब्द मुलांना सांगणे आणि त्यासंदर्भात मुलांशी चर्चा करावी असे शब्द येतील माकड ,चमचा, विमान, मासा ,चिमणी ,कमळ इ
असे शब्द आल्यानंतर प्रत्येक शब्दानंतर मुलांना विचारायचं जसे कमळ या शब्दात म चा आवाज आला का? कुठे आला? सुरुवातीला, शेवटी ,की मध्ये आला? काही मुले सांगतील तर काही मुलांना सांगण्यास अडचण जाईल मग अशावेळी शब्द तोडणे व शब्द जोडणे ही ॲक्टिविटी मुलांसोबत घ्यावी जसे
क म ळ — कमळ अशा प्रकारची कृती प्रत्येक शब्द सोबत जर मुलांना सोबत घेतली तर मुलांच्या लगेच लक्षात येईल की,म चा आवाज शब्दात कुठे आला त्यानंतर पुढची कृती म्हणजे म अक्षर येणारे असे चित्र मुलांना दाखवावे आणि त्याची नावे सांगून घ्यावी जसे मासा विमान माकड इत्यादी आणि वरील प्रमाणेच आवाजाचा खेळ घ्यावा.
पायरी 3 –
मुले आता बऱ्यापैकी तुमचा आवाज असणारे शब्द सांगतात आता शिक्षकाची पुढील कृती महत्त्वाची म्हणजे म हे अक्षर फळ्यावर लिहावे त्याला गोल करावा. मुलांकडून म आवाज असणारे शब्द सांगून घ्यावे आणि मुलांनी सांगितल्याप्रमाणे फळ्यावर म च्या भोवती ते शब्द लिहून घ्यावे मुले सुद्धा उत्साहाने भरपूर शब्द सांगतील आणि आपण केलेल्या म या अक्षराला गोल केल्याप्रमाणे मुलांनासुद्धा त्यांनी सांगितलेल्या शब्दातील म या अक्षराला गोल करायला सांगायचे. मुले ही कृती अतिशय उत्साहाने करतात.
आपल्या अक्षर गटातील एका अक्षरा सोबत आपण या कृतीने सोबत आणखी आता दृढी करणासाठी आणखी काही कृती पाहूया
१) अक्षर हवेत गिरवणे
२) अक्षर पाठीवर गिरवणे
३) हेच अक्षर फरशीवर मोठ्या आकारात काढणे व त्यावर बिया मनी दगड इत्यादी वस्तू ठेवणे
४) वर्तमानपत्रात म या अक्षराला गोल करणे.
अशा पद्धतीने अक्षर गटातील प्रत्येक अक्षरावर जर मी काम केले तर अक्षराच्या दृढीकरण यासोबतच मुले अर्थपूर्ण शब्द वाचायला लागतात आणि या अक्षर गटावर आपण त्यांना छोटी छोटी वाक्य व वाचन पाठ सुद्धा वाचायला देणार आहोत त्यामुळे एक अक्षर गट पूर्ण झाल्यानंतर मुले अक्षर शब्द वाक्य आणि अर्थपूर्ण असा वाचन पाठ वाचायला लागतील.
आणि सुरुवातीच्या काळात जर कमी कालावधीत मुलांच्या हाती अर्थपूर्ण वाचायला मिळालं आणि एकदा का मुलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की मला आता वाचता येते तर पुढील अक्षर गट हे सहज आणि सुलभ आणि वेगात होता म्हणूनच आरंभीच्या वाचनामध्ये अक्षर गटाकडून लिपी परिचय याच क्रमाने कुठलीही कृती न वळता गेल्यास आपली मुले 100% वाचायला लागतात.

संकलन देविदास गोसावी
विषय सहायक मराठी DIECPD बुलडाणा
सौजन्य QUEST, तथा माझे पुस्तक
[5/7, 10:21 AM] devidas gosavi82:

Published by

devidas1982

मी एक प्राथमिक शिक्षक आहे.व आज रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) बुलडाणा येथे कार्यरत आहे.मला आरंभिक साक्षरतेवर काम करायला आवडते तसेच जे मुले अभ्यासात मागे राहतात त्यांच्यासोबत सुद्धा काम करतो.यासाठी शिक्षक ,पर्यवेक्षकीय यांत्रानेसोबत काम करत आहे . यासाठी मला QUEST व MSCERT पुणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s