*सहभागी वाचन*

*सहभागी वाचन*
*उद्दिष्टे*
१)मुलांना गोष्टीचा आनंद मिळणे.
२) लिहिलेल्या भाषेची वैशिष्ट्ये व स्वरूप लक्षात येणे.
३) ओघवते वाचन कसे करावे हे समजणे.
४) लेखी मजकुराची जाण विकसित करून देणे.
५) विराम चिन्ह यांचे वाचन तसेच परिचय होणे.
पुस्तक कोणते निवडावे–
१) भरपूर चित्र व कमी मजकूर असणारे
२) पुस्तक आकाराने मोठे असणारे.
३) शब्दांची पुनरावृत्ती होणारे पुस्तके निवडावे.
४)मुलांच्या भावविश्वाशी संबंधित किंवा मुलांचे अनुभव शिक्षकांनी लिहिलेले असेल तर ते पुस्तक वापरावे.
*सहभागी वाचन कसे करावे ते पाहूया*-=
*दिवस पहिला-*
पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवा आणि सांगावे आज मी तुम्हाला या पुस्तकातून एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. मुखपृष्ठावरील चित्र दाखवून चित्र पहा आणि विचारा कशाबद्दल गोष्ट असेल? मुलं जी उत्तरे देतील ती उत्तरे स्वीकारावे मुलांची उत्तरे देण्याचा अंदाज ऐकून घ्यावा.
नंतर पुस्तकाचे एकेक पान पलटत आतील चित्रांवरून मुलांना गोष्टीचा अंदाज करता येतो का ते पहावे मुलांना चित्रावर प्रश्न विचारावे पुढे काय झालं असेल? काय होईल? असे करत संपूर्ण पुस्तकात उलगडून दाखवा.सगळे पुस्तक दाखवा झाली की मग फक्त दाखवा आता मी तुम्हाला लिहिलेली गोष्ट वाचून दाखवणार आहे आणि गोष्टीचे नाव सांगा.
आता गोष्ट वाचताना वाक्यातील प्रत्येक शब्दावर बोट ठेवले व वाचतांना आवाजात योग्य तो चढ-उतार योग्य जागी विराम घेत वाचन करावे आणि मध्ये एखाद्या दुसरे काही प्रश्न सुद्धा विचार आहे प्रश्न विचारताना एक काळजी अशी घ्यावी ही गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याचा तास होता कामा नये. पहिल्या दिवशी मी जे पुस्तक सहभागी वाचण्यासाठी निवडणार आहे त्यातील मुख्य घटनांचे चित्र व त्याखाली त्या घटना ठळक व मोठ्या अक्षरात लिहिलेले असाव्यात.शेवटी त्या चित्रांच्या घटनाक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने लावून घ्यावा व त्याखाली लिहिलेले वाचावे.
*दिवस दुसरा-*
आपण काल जी गोष्ट वाचली ती गोष्ट मी तुम्हाला आज परत वाचून दाखवणार आहे आणि बोट ठेवून गोष्ट योग्य स्वराघातासह वाचून दाखवा. गोष्ट वाचून दाखवताना मध्ये मध्ये अंदाज घ्यावा जे ध्वनिदर्शक किंवा पुनरावृत्ती असलेले शब्द आहेत ते मुले वाचतात का या गोष्टीचा अंदाज घ्यावा वाजत असल्यास त्याठिकाणी थांबून त्यांना वाचून घ्यावे व अशा पद्धतीने संपूर्ण गोष्ट वाचून घ्यावी. शेवटी आवाजाचे किंवा पुनरावृत्ती असणारे शब्द वेगळे लिहावे व मुलांना विचारून पहावे ही मुले सांगतात का आणि काही प्रसंगावर मुलांसोबत चर्चा करावी.
*दिवस तिसरा-*
*उद्दिष्ट-मुलांना पुस्तकाचे लेखक व चित्रकार माहिती होणे.*
*चित्रांत संदर्भ घेऊन वाचता येणे.*
तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना मुखपृष्ठ दाखवून विचारावे ही गोष्ट कोणी लिहिली? या गोष्टीचे लेखक कोण आहे?
चित्रकार कोण आहे?
मुलांनी दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घेऊन गोष्ट वाचायला सुरुवात करावी आता आपण वाचून दाखवत असताना मुले सोबत वाचतात का याचासुद्धा अंदाज घ्यावा. मुले जर वाचत असतील तर त्यांना वाचून देत आपण सुद्धा वाचा याठिकाणी अप्रत्यक्षरीत्या विरामचिन्हांची ओळख व वाचन सुद्धा सांगावे आणि लक्षात आणून द्यावे मध्येच एखाद्या ठिकाणी थांबून तिथे काय लिहिले ते विचारावे आणि अंदाज घ्यावा या पद्धतीने गोष्ट वाचून दाखवावी.
*दिवस 4-*
*उद्दिष्ट-चित्रातील बारकावे लक्षात आणून देणे*.
चौथ्या दिवसाची सुरुवात करताना पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ दाखवावे आणि मुखपृष्ठ व मलपृष्ठ कशाला म्हणतात हे सुद्धा सांगावे चित्रकाराचे नाव काय लेखकाचे नाव काय याचा अंदाज घ्यावा आणि पुस्तक वाचत असतांना चित्रं व विशेष करून चर्चा घ्या चित्रात काय दिसते यावरून गोष्टीचा अंदाज व गोष्ट काय लिहिले चित्र तीन पात्रांविषयी सुद्धा बोलावे आणि परत एकदा संपूर्ण गोष्ट वाचून दाखवा आणि चित्र वाचत असताना मुलांच्या सांगण्यामध्ये कुठे काय सुटले ते गोष्ट वाचत असताना त्यांना सांगावे.
*दिवस पाचवा-*
*उद्दिष्ट-गोष्टीतील मुख्य घटनांचा घटनाक्रम सांगणे.*
पाचव्या दिवशी गोष्टीतील प्रमुख टप्पे म्हणजेच मुख्य घटना त्यांचे चित्र काढा तयार ठेवावे त्याखाली मोठ्या अक्षरात मजकूर लिहिलेला असावा आणि त्या घटनांचा क्रम मुलांकडून लावून घ्यावा कोणत्या घटनेनंतर कोणती घटना घडली असेल याचा अंदाज मुलांकडून करून घ्यावा आणि मुले अंदाज करत त्या घटनांचा क्रम लावतील त्याखाली काय मजकूर लिहिला असेल ते विचारावे आणि आपण सुद्धा तो मजबूत मोठ्या आवाजात वाचून दाखवावा.
तसेच या टप्प्यात आणखी एक महत्त्वाची कृती म्हणजेच फळ्यावर गोष्टीतील एखादे वाक्य लिहावे आणि त्यातील एखादा शब्द गाळून मुलांना आपल्याजवळील शब्द टाकून ते वाक्य वाचण्यास सांगा जसे
मला भाकरी खायला आवडते.
या वाक्यात भाकरी हा शब्द गाळून मुलांना आणखी काय काय आवडते ते शब्द घालून हे वाक्य वाचून घ्यावे.
*दिवस सहावा-*
आपण गेले पाच दिवस एका पुस्तकावर बराचसा सराव घेतला आहे आता सहाव्या दिवशी मुलांना हे पुस्तक हाताळायला द्यावे दोघा दोघांमध्ये एक पुस्तक द्यावे आणि त्याच्या सोबत बसून निरीक्षण करावे बहुतेक मुले ही पुस्तके आपल्यासारखे वाचण्याचा प्रयत्न करतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी आरती त्या ठिकाणी आपण मदत करावी.
*सहभागी वाचन साक्षरतेच्या या सुरुवातीच्या टप्प्यावर एकच गोष्ट परत परत वाचणे गरजेचे असते कारण मुलांना एकच गोष्ट परत परत वाचायला आवडते परंतु पुढे काही कालावधीनंतर पुस्तक बदलून गोष्टी वाचून दाखवावे. आरंभिक साक्षरतेत महत्वाची भूमिका सहभागी वाचनाची आहे कारण मुलांनी पऱ्यांच्या गोष्टी ह्या थोरामोठ्यांचा कडून ऐकलेल्या असतात परंतु त्यांना याची जाणीव नसते की आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या गोष्टी कुठेतरी लिहिलेले असतात आणि ज्या गोष्टी आपण बोलतो त्या लिहिल्या जातात आणि जे लिहिले जाते ते वाचले सुद्धा जाते याची जाणीव सुद्धा सहभागी वाचनातून मुलांमध्ये निर्माण होते. वाचन समृद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी वर्गामध्ये मुलांच्या वयोगटाला अनुरूप असे गोष्टींची पुस्तके उपलब्ध असणे गरजेचे आहे सुरुवातीच्या काळामध्ये मुलांना चित्र जास्त आणि मजकूर कमी अशा स्वरूपाची पुस्तके असणे गरजेचे आहे तसेच सहभागी वाचन करत असताना बऱ्याच मोठ्या टप्प्यावर आपण गेलो असलो तरी सुद्धा या प्रमुख उद्दिष्ट मुलांना केवळ या गोष्टीतून आनंद मिळणे हेच असावे तसेच प्रत्येक मुलाने आपण सांगत असलेली गोष्ट ऐकली पाहिजे असा अट्टाहास सुद्धा शिक्षकाने करू नये व गोष्टी निवडत असताना मुलांचा वयोगट लक्षात घेऊन तसेच मुले किती वेळ एका ठिकाणी बसू शकतात हेसुद्धा शिक्षकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.आरंभिक साक्षरतेच्या काळामध्ये सहभागी वाचनाची कृती ही वरील प्रमाणे झाल्यास मूल वाचनाकडे खूप लवकर येते असे शास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात आले आहे. म्हणून इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये रोज किमान एक गोष्ट ही वाचून दाखवली पाहिजे असे केल्यास आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले ही वाचण्यासाठी तयार होतील.*
* संकलन*
*देविदास गजानन गोसावी*
*विषय सहाय्यक मराठी*
*DIECPD बुलडाणा*
*सौजन्य – QUEST*

अक्षर गटाकडून लिपी परिचय

अक्षर गटाकडून लिपी परिचय
सर्वसाधारणपणे आपण पहिलीत मुले आले की प्रारंभीचे वाचन लेखन शिकण्यासाठी वर्णमाला शिकवण्यास सुरुवात आणि एकच अक्षर फक्त होण्यासाठी तेच अक्षर दहा-दहा वेळा लिहिण्यास सांगतात किंवा अक्षर शिकवताना अक्षरांची सांगड शब्दांची घालतो. जसे की क कमळाचा, व वजनाचा अशा पद्धतीने आणि अशी सांगड मुलांची एकदा पक्की झाली की अनोळखी शब्द वाचताना मुलं त्यातील एकेक अक्षर त्यांच्या मनातील शब्दांची सांगड घालत वाचता त्यामुळे दिलेला शब्द कळणं मुलाला अवघड जाते.आणि वाचन हे अर्थ विहीन होते या दोन्ही प्रक्रिया वाचन शिकण्यातल्या प्रमुख अडचणी आहे काही ठिकाणी मुलांना धडे वाचून दाखवल्या कालांतराने तेसुद्धा मुलांचे पाठवता व अशा वेळीसुद्धा धड्या बाहेरचे मुले वाचू शकत नाही म्हणजे ही सुद्धा वाचनातील एक मोठी अडचण आहे.
म्हणूनच आपण आता लिपी परिचय करून देताना एका वेगळ्या पद्धती कडे म्हणजेच अक्षर गट वापरून लिपी परिचय पर्यंत कसे जाता येईल व अर्थासहित एक असे वाटते त्यासाठी आपण पद्धत समजून घेऊया वाचन शिकवत असताना खालील टप्प्यानुसार आपण जाऊया
१) अक्षरांचे गट
२) अक्षर परिचयाची तंत्रे
३) अक्षराचे दृढीकरण
४) शब्दचक्र
वरील टप्प्यानुसार आपण एकही पायरी न वगळता गेल्यास आपल्या वर्गातील शंभर टक्के मुले हे वाचकापर्यंत येतात ते कसे आपण पाहूया.
१) अक्षरांचे गट-
आपला पारंपारिक गट
क,ख,ग,घ,च,तर,जी,झ
वरील प्रमाणे जर घेतला तर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील? किती वाक्य तयार होतील?
तर याचे उत्तर अत्यल्प कारण यात स्वर नाही आणि मर्यादा सुद्धा भरपूर आहे
म्हणून वर्णमालेच्या क्रमाने अक्षरे शिकवल्यास वरील गटापासून मुलांना समजतील असे पुरेसे अर्थपूर्ण शब्द
बनत नाही आणि ह्याच क्रमाने गेल्यासं संपूर्ण लिपी परिचय होईपर्यंत मुले अर्थपूर्ण वाचनाकडे वळू शकत नाही.
आता आपण अक्षरांच्या क्रमात बदल करून हे वेगळा अक्षर गट घेऊन पाहूया
म,क,त,न,झ,घ,ह ा
आता ह्या गटा पासून बनणारे शब्द माझा, कान हात मामा काका झाक इत्यादी. तसेच वाक्य माझा हात, माझा काका, माझा मामा.इ
म्हणजेच ह्या अक्षर गटातून आपल्याला काय दिसते? काय लक्षात येते? तर मुलांच्या भावविश्वात आणि त्यांच्या संबंधित शब्द वाक्य अधिक प्रमाणात तयार होतात आणि मुलांच्या भावविश्वातील त्यांच्या परिचयातील आणि स्वतःच्या संबंधित शब्दांपासून वाचनाचा प्रारंभ केल्यास वाचन मुलांना खूप सोपं जातं आणि या गटापासून अधिकाधिक अर्थपूर्ण शब्द तयार होतात आपण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने सुद्धा अक्षर गट तयार करू शकतो फक्त काळजी एवढेच घ्यायची की अक्षर गट तयार करत असताना मुलांच्या भावविश्वाशी संबंधित शब्द कसे तयार होते हे लक्षात घ्यावे. म्हणजेच आदिवासी भागांमध्ये किंवा मराठी पेक्षा वेगळी बोली असलेल्या भागात त्या पद्धतीचा अक्षर गट तयार होईल.
२) अक्षर परिचयाची तंत्रे
आपण अक्षर गट कसा तयार होतो हे बघितले आता अक्षराच्या परिचय कडे जाऊया अक्षय परिचय ची पहिली पायरी म्हणजे ‘आवाजाचा खेळ’
काय आहे आवाजाचा खेळ तर आपल्या अक्षर गटातील पहिल्या अक्षर आपण घेऊ या ‘म’ म सुरुवातीला एक ध्वनी म्हणून आपण पाहूया . म हा आवाज असणारे धोनी असणारे शब्द मुलांना सांगणे आणि त्यासंदर्भात मुलांशी चर्चा करावी असे शब्द येतील माकड ,चमचा, विमान, मासा ,चिमणी ,कमळ इ
असे शब्द आल्यानंतर प्रत्येक शब्दानंतर मुलांना विचारायचं जसे कमळ या शब्दात म चा आवाज आला का? कुठे आला? सुरुवातीला, शेवटी ,की मध्ये आला? काही मुले सांगतील तर काही मुलांना सांगण्यास अडचण जाईल मग अशावेळी शब्द तोडणे व शब्द जोडणे ही ॲक्टिविटी मुलांसोबत घ्यावी जसे
क म ळ — कमळ अशा प्रकारची कृती प्रत्येक शब्द सोबत जर मुलांना सोबत घेतली तर मुलांच्या लगेच लक्षात येईल की,म चा आवाज शब्दात कुठे आला त्यानंतर पुढची कृती म्हणजे म अक्षर येणारे असे चित्र मुलांना दाखवावे आणि त्याची नावे सांगून घ्यावी जसे मासा विमान माकड इत्यादी आणि वरील प्रमाणेच आवाजाचा खेळ घ्यावा.
पायरी 3 –
मुले आता बऱ्यापैकी तुमचा आवाज असणारे शब्द सांगतात आता शिक्षकाची पुढील कृती महत्त्वाची म्हणजे म हे अक्षर फळ्यावर लिहावे त्याला गोल करावा. मुलांकडून म आवाज असणारे शब्द सांगून घ्यावे आणि मुलांनी सांगितल्याप्रमाणे फळ्यावर म च्या भोवती ते शब्द लिहून घ्यावे मुले सुद्धा उत्साहाने भरपूर शब्द सांगतील आणि आपण केलेल्या म या अक्षराला गोल केल्याप्रमाणे मुलांनासुद्धा त्यांनी सांगितलेल्या शब्दातील म या अक्षराला गोल करायला सांगायचे. मुले ही कृती अतिशय उत्साहाने करतात.
आपल्या अक्षर गटातील एका अक्षरा सोबत आपण या कृतीने सोबत आणखी आता दृढी करणासाठी आणखी काही कृती पाहूया
१) अक्षर हवेत गिरवणे
२) अक्षर पाठीवर गिरवणे
३) हेच अक्षर फरशीवर मोठ्या आकारात काढणे व त्यावर बिया मनी दगड इत्यादी वस्तू ठेवणे
४) वर्तमानपत्रात म या अक्षराला गोल करणे.
अशा पद्धतीने अक्षर गटातील प्रत्येक अक्षरावर जर मी काम केले तर अक्षराच्या दृढीकरण यासोबतच मुले अर्थपूर्ण शब्द वाचायला लागतात आणि या अक्षर गटावर आपण त्यांना छोटी छोटी वाक्य व वाचन पाठ सुद्धा वाचायला देणार आहोत त्यामुळे एक अक्षर गट पूर्ण झाल्यानंतर मुले अक्षर शब्द वाक्य आणि अर्थपूर्ण असा वाचन पाठ वाचायला लागतील.
आणि सुरुवातीच्या काळात जर कमी कालावधीत मुलांच्या हाती अर्थपूर्ण वाचायला मिळालं आणि एकदा का मुलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की मला आता वाचता येते तर पुढील अक्षर गट हे सहज आणि सुलभ आणि वेगात होता म्हणूनच आरंभीच्या वाचनामध्ये अक्षर गटाकडून लिपी परिचय याच क्रमाने कुठलीही कृती न वळता गेल्यास आपली मुले 100% वाचायला लागतात.

संकलन देविदास गोसावी
विषय सहायक मराठी DIECPD बुलडाणा
सौजन्य QUEST, तथा माझे पुस्तक
[5/7, 10:21 AM] devidas gosavi82:

*मजकूर समृद्ध वातावरण काय

नवे प्रश्नांकित चेहरे! नव्या गणवेशात ,नवी नवी दप्तरे घेऊन मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवतात ! ज्यांना आपल्या आईला अथवा आजीला सोडून क्षणभरही दूर राहण्याची सवय नाही. ज्यांना अक्षर ,अंक वाचन,लेखन, शैक्षणिक साहित्य यापैकी काहीच परिचित नाही अशी निरागस, अजाण कोवळी बालके!

ही बालके जेव्हा शाळेत येतात तेव्हा अनेक अर्थाने ती नव्या वातावरणात प्रवेश करीत असतात. शाळेच्या परिसरात आल्यावर विविध झाडेझुडपे व रंगीत भिंतीआणि वर्गात प्रवेश केल्यावर दिसणारा फळा, इंग्रजी शब्दार्थ ,उजळणी ,मोठमोठे उपदेशपर सुविचार ,विविध चित्रे तिही आकलनापलिकडची  या अनोळखी व आपल्याशा  न वाटणाऱ्या भिंती, दिवसभर अनेकदा लक्ष जाऊनही असं त्यात काहीच दिसत नाही. हे साचेबद्ध वातावरण पाहून ते दिवसभरातून अनेक वेळा घरी जाण्यासाठी प्रयत्न करतात व अनेक वेळेस अनिश्चिततेनेच शाळेत येताना आढळतात. माझ्याकडेही असेच घडतंय का? काय आहे कारण- आज बहुसंख्य पालकांच्या महत्त्वाकांक्षा या चाकोरीतल्या आहेत का? स्पर्धेच्या वातावरणात शाळा टिकली पाहिजे! का,निकालभिमुख वातावरणामुळे शिक्षणच साचेबद्ध झाले आहे. मुलांच्या आजूबाजूला जर त्यांची उत्सुकता  अबाधित राहील व कुतूहल जागृत होईल असे वातावरण असेल तर ते नक्कीच समरस होतील. भिंतीवरील व शालेय परिसरातील मजकूर त्यांच्या भावविश्वाशी संबधित आवडीचा , व अर्थपूर्ण वाटेल असा  असायला हवा . मुले संवादातून, निरीक्षणातून, अनुकरणातून अनेक गोष्टी शिकत असतात. अनौपचारिक खेळातूनही त्यांना खेळायला, बागडायला ,गाणे गायला आवडते. शाळेतल्या वृक्षवल्ली ज्याप्रमाणे स्वधर्माने वाढतात तशी आपल्या मुलांचीही मने विकसित व्हायला हवीत.  मुले शाळेत प्रवेश घेतात त्या सुमारास मातृभाषेतील मूलभूत रचनांवर बहुतेकांना विस्मय वाटावा एवढे प्रभुत्व मिळवलेले असते. श्रोता म्हणून संदेशाचे रूपांतर करणे या मुलांना जमते.( उदा. सांगितल्यावर पाण्याचा पेला घेऊन येणे आणि तो जागेवर ठेवणे) सगळ्या क्षमता आपल्या दिनक्रमातून मुले आपले आपण कमावतात. त्यांना कोणी शिकवते असे नाही, जे जे काही त्याच्या भोवताली घडते ते ते सर्वकाही मुलांच्या अवधानाच्या चाळणीतून जातेच आणि मुलाच्या भावविश्वाचा भाग बनते. अक्षर आणि शब्दांची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होते.

आपण रचनावादात सक्रिय शिक्षणालाच महत्त्व देतो आहोत . म्हणूनच आज आपण सुलभकाच्या भूमिकेत आहोत. पाठ्यपुस्तकांच्या आधारे अध्ययन अनुभव देण्याचे माध्यम म्हणजे शिक्षक किंवा सुलभक. एकेक पाठ हा एक एक अनुभव असतो. कारण विविध प्रकारचे वाड्.मय निर्माण केलेल्या लेखकाने मांडलेल्या अनुभवाचे ते एक शब्दरूप असते. म्हणून मुलांना वाचन करायला शिकवायचे असेल तर त्यांना वाचनाच्या अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. त्याच्या अवतीभवती असणारं  वातावरण त्याला अर्थपूर्ण वाटायला हवं. कारण हे वातावरणच भाषेचे धडे देण्यात एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. मुलांच्या आजूबाजूला भरपूर लिखित मजकूर असेल तर सर्वांगीण विकासास मदत होईल. वर्गात, परिसरात अर्थपूर्ण वाटतील अशा संधी आपण मुलांना वर्गातच उपलब्ध करूनही देऊ शकतो.

कोणत्या संधी आहेत? ज्या मुलांचे वाचन समृद्ध करू शकतात. 

वर्गातील भिंतीच नाहीतर कोपरा न कोपरा वाचनीय करता येईल. फलकाच्या दोन्ही बाजूला दोरीवर लटकवलेली हाताला सहज येतील अशी रंगीबिरंगी पुस्तके टांगून ठेवू या. ज्यामुळे ती सहज हाताळता येतील. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारे कार्टून वर्गांच्या भिंतीवर असणारी चित्रे वाचण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. कार्टूनचा  आणि आजच्या मुलांचा तर फार जवळचा संबंध आहे.  कार्टून काय म्हणते ते शब्द वाचण्याचा व संवाद करण्याचा  प्रयत्न करतात. या टप्प्यातून मिळणारा आनंद हाच मुलांच्या वाचन विश्वास प्रेरक ठरतो. ही गोडी अजून वाढावी यासाठी शाळेतील ग्रंथालये ही खूप मोठी भूमिका पार पाडतात. परंतु आपल्याकडील ग्रंथालयेही बंदिस्त स्वरूपातच जास्त प्रमाणात आढळतात. त्यातील पुस्तकेही उत्तमोत्तम लेखकांचे असतात परंतु मुलांना आवडतीलच अशी नाहीत. त्यांच्या आकलनापलीकडची आहेत. भाषेचे अध्ययन चांगले होण्यासाठी विद्यार्थ्याला चांगले ऐकायला, बोलायला व वाचायला आले पाहिजे. तसेच त्यांना चांगले  लिहायला हीआले पाहिजे. यासाठी वर्गात एक  लेखन कोपराही बनवू या. मुले याचा उपयोग लिपी वापरूनच करतील असे नाही तर ती त्यावर रेषा ओढतील , चित्र व आकार काढतील , उच्चाराचा अंदाज करत  अक्षरे लिहितील. तसेच या कोपऱ्यात लिहिण्यासाठी आवश्यक  सामुग्रीही ठेवता येईल जसे. पेन्सिल, कागद रंगपेटी,खडू इत्यादी. तसेच या लेखन कोपऱ्याच्या बाजूला मुलांच्या स्व लेखनाचे मजकूर येण्यासाठी विविध अभिव्यक्तीचे फलक बनवता येतील. उदा. पुस्तक काय म्हणाले? झाडे,फुले काय म्हणाली? यात आपण मुलांनी काय लिहिले हे प्रथम समजून घेण्याचा  प्रयत्न करुया. काय लिहिले हे त्याला वाचून दाखवायला सांगून ते जे सांगेल ते त्याच्या स्व लिपीतील लिखाणाखाली आपण पुन्हा लिहून ठेवावे.  वरील दुसऱ्या अभिव्यक्तीत मुले फुलांची, झाडांची चित्रे, आकारही काढतील. अशा मुलांना रुचणाऱ्या ,आवडणाऱ्या एक ना अनेक संधी तुमच्याही मनाच्या कोपऱ्यात असतील.

या संधी आपल्याला सहज कशा निर्माण करता येतील?

मुलांना अभिव्यक्ती व अनुभव प्राप्त करून देणाऱ्या संधीची इतरांपेक्षा अधिक आवश्यकता असते. कारण भाषा शिकण्यापेक्षा भाषा दैनंदिन वापरात येणे हा भाषा शिक्षणातील महत्त्वाचा भाग आहे. या संधीचा आपण पुरेपूर उपयोग केला तर मुलांचे अध्ययन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. हे वातावरण मुलांना भावेल, आवडेलअसे असेल. लिहिलेल्या मजकुराचा काय आणि कसा उपयोग केला जातो हे समजणे मुलांच्या लेखन-वाचनातील  प्रगतीसाठी फारच आवशक्य आहे.

 सूचना

                       माझा वापर करा.

                       येथे हात धुवा.

या छोट्याशा  अर्थपूर्ण शब्दाने सुरुवात करुया. शब्दांचा व दृष्टीचा आवाका सरावाने वाढवूया. अशा सूचना योग्य ठिकाणी शाळेत लिहून ठेवता येतील. सुरुवातीला मुलांना त्याप्रसंगी त्या त्या ठिकाणी वाचून दाखवाव्यात लागतील व कृती करण्यास सांगावे लागेल. मुले हळूहळू वाचण्याचा व त्याप्रमाणे कृतीही करण्याचा प्रयत्न करतील. वर्गातील प्रत्येक वस्तूंना नावे दिली तर ती मुलांच्या दररोज नजरेत येतील. जसे. टेबल, फळा, भाषा पेटी ,गणित पेटी , वाचन साहित्य इत्यादी. 

दिनदर्शिकेच्या ‘साह्याने मुलांना वार, दिनांक, महिना व वर्ष यांची सहज ओळख करून देता येईल. सोबत चित्रात दाखवलेल्या दिनदर्शिकेतून कार्डे बदलून आज कोणता वार आहे? काल कोणता वार होता? उद्या कोणता वार असेल? याचप्रमाणे आवर्जून लक्षात आणून देण्यासाठी दिनांक व महिना यांचेही अशा चर्चेतून व प्रश्नातून काळाचे भान विकसित करण्यास मदत होईल. आपण दररोज मुलांची हजेरी उपस्थितीपत्रकातून भरत असतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे वर्गात हजेरीतक्ता लावला तर मुले स्वतःची हजेरी स्वतःच  नोंदवतील. या तक्त्यात पहिल्या उभ्या रकान्यात मुलांची नावे, पहिल्या आडव्या ओळीत वारांची नावे या तक्त्यावर वर्ग शिक्षकाचेही नाव असेल तर मुले ही बाई व गुरुजी स्वतःची हजेरी लावतात हे पाहून स्वतःची ही सही ,काहीजण नुसत्याच रेषा ओढतील  किंवा गिरगिटतील. या लेखन जाणिवेतून जातानाचा आनंद मात्र वेगळाच असतो.

पाककृती या कृतीत मुले आनंदाने सहभागी होतात. उदा. लिंबू सरबत, भेळ.या कृतीच्या निमित्ताने मुलांना वेगवेगळ्या क्रियापदांचा अप्रत्यक्षरीत्या परिचय देत असतो. जसे चिरणे ,कुटणे, किसणे, ढवळणे इ. या पदार्थासाठी लागणाऱ्या जिन्नसांची यादी, कृती सांगतानाचा योग्य क्रम, त्याची चव. या गोष्टी लिहूनही दाखवता येतील. या लिहिलेल्या गोष्टी तेही परत परत वाचतील हा लिहिण्याचा अनुभव आपल्यालाही खूपच आनंद देऊन जातो. जेव्हा मुले या कृतीचे चित्र रेखाटतात आणि जेव्हा ते त्याचा क्रम सांगतात तेव्हा त्यांचे लेखी मजकुराचे नवे जग खुले झालेले असते. लेखी मजकुराशी जवळीक वाढते . कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवत, आपण आपल्याला हवे तेव्हा हव्या तितक्या वेळा ते वाचू शकतो व  रेखाटू शकतो आणि सांगू शकतो.

‘गाणे’ जे मुलांना शिकवायचे आहे ते मोठ्या अक्षरात लिहून ठेवूया. सुरुवातीला बोट ठेवत वाचून दाखवू या. त्यामुळे मुले स्वतःच वाचण्याचा प्रयत्न करू लागतील व तालासुरात योग्य उच्चारांसह म्हणण्याचा प्रयत्नही करतील.

वाढदिवसवर्गातील मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल तर त्याला लेखी शुभेच्छा देणारा संदेश फळ्यावर लिहून तो मुलांना वाचून दाखवता येईल.

वाचन कोपरा यात मोठ्या आकाराची संपूर्ण वर्गाला दिसतील अशी चित्रे व मजकूरअसलेली पुस्तके असावीत. ती वाचून दाखवण्याआधी स्वतः दोन-तीन वेळा वाचावी. गोष्ट कायआहे ,पात्र कोणती , कशी बोलतात, कशी वागतात मग मुलांना ते कसे वाचून दाखवावे लागेल याचा विचार करूया. आता थोडे पुढे जाऊन अशी कल्पना करू या की, एके दिवशी गावात खूप माकडे आली. त्यांनी गावात खूप धुमाकूळ घातला. मुलांच्या मनाची खळबळ झाली. शाळेत आली ती माकडा संबंधिच बोलत आली. त्यांच्याच बोलण्यातील चार- पाच वाक्य फळ्यावर लिहून तीच त्यांना वाचायला सांगितली तर किती गंमत होईल! माकडासंबंधीचा मजकूर पुढील प्रमाणे असेल-

         आज गावात खूप खूप माकडं आली.

         एका माकडान तर दारात उडी मारली.

         खिडकीतून माकड घरात आल.

         माकडान मही टोपीच पळवली.

         टोपी घेऊन माकड काय करणार?

मग शिक्षकाने मुलांसाठी वाचायला मजकूर तयार केला व वाचून दाखवला.

      ‘माकडा माकडा हुप हुप, फळे खाऊ खूप खूप.’

मुले ती आनंदाने वाचत होती, म्हणत होती.

 “केवळ अनुकरण करून पानभर लिहिण्यापेक्षा मुलांच्या अनुभवांना सशब्द करणारे व त्याच्या ठिकाणची आत्म प्रगटीकरणाची ओढ पुरविणारे त्यांचे एक वाक्य त्यांच्या अंगचे वाचन-लेखन कौशल्य वाढवण्यास कितीतरी अधिक मोलाचे ठरते”. त्यामुळे त्यांचे लिखाण हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनले पाहिजे. कारण आपण वर्गात जे बोलतो ते लिहिता येते, लिहिलेले परत परत वाचता येते. असे लक्षात येईल. मराठी सारखी भाषा डावीकडून उजवीकडे वाचतात व   लिहितात, नवीन ओळ लिहायला सुरुवात करताना कागदाच्या उजव्या टोकाकडून डाव्या टोकाकडे यावे लागते, वाक्यातील प्रत्येक शब्द सुटा लिहिला जातो. हेही कालांतराने लक्षात येईल. शाळेच्या परिसरात असलेली झाडे -झुडपे ,वेली ,फुले, डोंगरदऱ्या ,नद्या,नाले यांची माहिती विद्यार्थ्यांना आपण अशाच हसत-खेळत पद्धतीने करून द्यायला हवी. वर्गासमोरच मुलांच्या सोबत मातीत एखादे बीज पेरून त्या बीजाला अंकुर कसा फुटतो, अंकुराला पालवी कशी येते, पालवीचे इवलेसे रोप कसे होते आणि रोपांची हळूहळू वाढ कशी होते. यामधून साकार होणारी विकासावस्था त्यातून होणारा निर्मितीचा भाग त्यांच्यापुढे आपोआप विकसित होईल. यावरूनही आपण काही केले आहे किंवा करीत आहोत अथवा करू शकतो हा संस्कार रुजण्यास मदत होईल. कारण काही करावेसे वाटणे ही माणसाच्या मनोवृत्तीतील महत्त्वाची संकल्पना आहे. शिकण्याची खेळकर शैली व वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात मुलांना शिकायला सहज आवडते. अशा एक ना अनेक संधी आपण मुलांना निर्माण करून इयत्तेची सर्व उद्दिष्टे मुले वैशिष्टपूर्ण सहभाग नोंदवून पूर्ण करतील.

श्री.देविदास गजानन गोसावी (विषय सहाय्यक मराठी बुलडाणा)

श्रीमती.शितल सच्चिदानंद बोधले

प्राथमिक शाळांमधील ‘वाचन’- कृष्णकुमार

प्राथमिक शाळांमधीलवाचन’- कृष्णकुमार

सारांशात्मक मराठी रूपांतरवर्षा सहस्रबुद्धे ( क्वेस्टकरिता )

प्रस्तावना

साक्षरतेचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. याची कारणे मुळापर्यंत जाऊन कृष्णकुमार तपासतात. ‘निरक्षरतेचे कारण गरिबीअसे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संशोधनांमध्ये मांडलेले आढळते. मात्र, कृष्णकुमार म्हणतात, की गरिबी हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. परंतु त्याहून जास्त गंभीर कारणे वाचन शिकवण्याचा पद्धतींशी जोडलेली आहेत. सुटी अक्षरे आणि सुटे शब्द, अर्थ समजता केवळ ओळखण्याच्या कौशल्यावर सध्या शाळांमध्ये भर दिला जातो. शिकणार्‍या मुलांना अर्थ समजण्यामधून मिळणार्‍या समाधानापासून दूरच राहावे लागते. अर्थ समजून वाचण्यातला आनंद त्यांना अजिबात मिळत नाही.

मुले मुळातच चौकस असतात. आसपास काय चालू आहे याविषयी त्यांच्या मनात विस्मय असतो. अशा उत्सुक मुलांना वाचनलेखन शिकवण्याच्या नावाखाली महिनोन् महिने अनुलेखन करायला लावले जाते. या पद्धतीने वाचायला शिकलेली मुले खर्‍या अर्थाने साक्षर होतात का, असा प्रश्न कृष्णकुमार उपस्थित करतात.

ते म्हणतात, की समाजात जबाबदारीने सहभागी होण्याची तयारी करून घेण्यासाठी ज्या प्रकारची साक्षरता लागते, ती साक्षरता मुलांना कमवायची असेल, तर अर्थ समजून वाचन करण्यासाठी मुलाला खूप प्रोत्साहन मिळायला हवे.

शिक्षणाचा प्रसार आणि साक्षरता हातात हात घालून पुढे गेलेले दिसत नाहीत. ज्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला, त्या मानाने साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय रीत्या वाढलेले नाही. कायम स्वरूपी साक्षर बनवण्यासाठी जेवढी वर्षे मुलांनी शाळेत टिकायला हवे, तेवढा काळ त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यात आपल्या शाळा साफ अयशस्वी ठरतात. ‘गरिबीकडे बोट दाखवत अनेक अभ्यासांमधून असे मांडले जाते, की गरीब पालक मुलांना शाळेतून काढतात आणि कामाला लावतात. या स्पष्टीकरणाचे कोणालाच नवल वाटत नाही. शिवाय भारतातली बालकामगारांची संख्या लक्षात घेता, त्याला पुष्टीच मिळते. नुकत्याच केलेल्या जवळजवळ पाचशेहून जास्त अभ्यासांमध्ये गळती आणि गरिबीचा असा थेट संबंध जोडलेला आढळतो.

मात्र, इयत्ता पहिली आणि दुसरी या दोन वर्षांमध्ये बालमजुरीचे मूल्य आश्चर्यकारक रीत्या एकदम वाढते की काय, असे वाटण्याएवढे या काळातले गळतीचे प्रमाण जास्त आहे. गळती झालेल्यांपैकी सुमारे ६१% विद्यार्थी अगदी लहान वयातच शाळा सोडतात. त्यांचे वय तेव्हा पाच ते सात वर्षांचे असते. आर्थिक कारणासाठी ही मुले शाळा सोडत असतील, तर याचा अर्थ असा निघतो, की पहिलीनंतरच्या वर्षदोन वर्षांत बालकामगार म्हणून त्यांचे मूल्य एकदम वाढत असावे ! नाही तर पहिलीत शाळेत नाव घातल्यानंतर त्या मुलाचे पालक दुसरीत त्याचे नाव शाळेतून का बरे काढून घेत असतील ?

यातून हेच ध्यानात येते की, गळतीच्या प्रश्नाकडे पाहताना आपण मुलांच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. तसे केले, तर एक प्रश्न आपण नक्कीच विचारू : “पहिलीतल्या मुलांना जे आवडते, जे हवे असेत ते आपल्या प्राथमिक शाळा देऊ करतात का ?” पहिलीच्या वयाच्या मुलांना असणार्‍या परमोच्च प्रेरणांपैकी एक म्हणजे अवतीभवतीच्या जगाबद्दल जाणून आणि समजून घेणे. अनारोग्य, कुपोषण, दिनक्रमावरचे निष्ठुर नियंत्रण अशा विपरीत घटकांमुळे ही प्रेरणा काहीशी मंदावत असली तरीही ती नाहीशी नक्कीच होत नाही. मुलाची परिस्थिती कशीही असेली तरी सहा वर्षांचे मूल भोवतालच्या जगाबाबत कमालीचे उत्सुक असते, त्याला ते कुशलतेने हाताळायचे असते, समजून घ्यायचे असते. हे सगळे करण्याच्या मूलभूत साधनांपैकी एक म्हणजेभाषा’, आणि भाषेच्या विस्मयकारक सामर्थ्यांशी पहिलीच्या वयाला मूल उत्तम प्रकारे परिचित असते. नाती जोपासण्यासाठी, जपण्यासाठी, भोवतालच्या विशाल जगाचा शोध घेण्यासाठी मुलाने भाषेचा उपयोग केलेला असतो. हालचाल, स्पर्श, नजर, ऐकणे आणि वास यांच्या बरोबरीनेच सहा वर्षांच्या मुलाने भाषेच्या उत्तेजित करणार्‍या (exciting) सामर्थ्यांचा अनुभव घेतलेला असतो. समाजात वावरण्यातून त्याला हे माहीत झालेले असते की वाचन, लेखन आणि इतरही बरेच काही नवे, ताकद देणारे असे शिकण्याची जागा म्हणजे शाळा !

मोठे होणे आणि अधिकार, सत्ता, ज्ञान यांचा संबंध, शाळेत जाण्याआधी, पाच वर्षांच्या मुलाच्या मनात कसा जोडलेला असेल हे आपल्याला उमगणे अवघड आहे. ते कणभर जरी आपल्याला समजले, तरी सर्वसामान्य प्राथमिक शाळेत जाणारे मूल कसे निराश होऊन जात असेल, हे आपल्याला सहज समजेल. शाळेत गेल्यावर त्याला कळते की जगाविषयी अधिक समजून घेण्याची शाळा ही जागाच नव्हे ! एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी मूल जी कौशल्ये वापरते, त्यांना पहिलीच्या वर्गात स्थानच नाही. ‘अर्थ लावणेआणिसमस्या सोडवणेयांचा शालेय अभ्यास विषयांमध्ये अंतर्भावच नाही !

अंतर्भाव आहे कशाचा ? तर, सुरुवातीलाच अक्षरांची नावे घोकण्याचा, त्यांचे आकार गिरवण्याचा ! पुन्हा पुन्हा संथा म्हटल्याप्रमाणे अक्षरांची नावे उच्चारणे आणि ती गिरवणे हेच मुलाने करणे अपेक्षित असते. अशा तर्‍हेने बाराखड्या यायला लागल्या की मग पाठ्यपुस्तकात दिलेली अक्षरे, त्यापासून बनणारे शब्द मुलाला वाचावे लागतात. या टप्प्यावर मुलाला ज्या शाळांना सामोरे जावे लागते, ते शब्द दीर्घ परंपरेने शिक्षणशास्त्रात रुळलेले शब्द असतात. मुलांची दृष्टी वा कुतूहल यांच्याशी त्या शब्दांचा दूरान्वयानेही संबंध नसतो.

शिवाय, मोकळेपणाने हात लावून पाहावे, हाताळावे, चाचपावे असे काहीही शाळेत नसते ! चौथ्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे निष्कर्ष असे होते : ५०% शाळांना पक्की इमारत नाही, मैदान नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही; ४०% शाळांमध्ये फळे नाहीत, तर ७०% शाळांमध्ये वाचनालये नाहीत. सहा वर्षे वयाच्या लहानग्यांच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर शाळा म्हणजे रंग नसलेली, कोंदट आणि अलिप्त अशी एक जागा ! तिथे जायचे सोडून द्यावे असे वाटण्यासारखी ! मग त्याचे कारण काहीही असो.

आतापर्यंत केलेल्या विषयाच्या फेरमांडणीतून आपण काही गृहीतकांपर्यंत पोचतो. ती ही, की भाषा शिकवण्याच्या पद्धती, विशेष करून वाचन शिकवण्याच्या पद्धती, प्राथमिक शाळांमधील गळतीच्या प्रश्नासंदर्भात कळीच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाविषयीचे आतापर्यंत आपण ऐकलेले असे स्पष्टीकरण, आपल्या शाळांमध्ये वापरल्या जाणार्‍या वाचन शिकवण्याच्या पद्धतींमध्ये दडलेले आहे. हे स्पष्टीकरण स्वीकारणे म्हणजे दारिद्र्याच्या आणि बालकामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य आणि यथार्थता आपण नाकारतो आहोत असे नव्हे. भुकेचा, निराश्रयाचा पटनोंदणीवर आणि उपस्थितीवर विपरीत परिणाम होतो हे निश्चितच. मुद्दा असा आहे की, या संदर्भात सर्व अंगांचा आणि कारणांचा काळजीपूर्वक विचार व्हायला हवा. शिक्षणाचे असे प्रतिरूप निर्माण व्हायला हवे, की ज्यात या सर्व कारणांची दखल घेतलेली असेल. प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक स्थितीची दखल घेणार्‍या अभ्यासकांनी प्रश्नाचा विचार करताना, अध्यापन पद्धतीविषयक कारणांना परिघावरचे, थोडे कमी महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्या कारणांकडे थोडे अधिक काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पाहणे सयुक्तिक ठरेल. खास करून वाचनलेखन शिकवण्याच्या पद्धतींबाबत जाकरूकतेने विचार व्हायला हवा. औपचारिक शिक्षणाची शालेय व्यवस्था ज्यांच्यावर उभारली जाते, अशी ही दोन पायाभूत अशी कौशल्ये आहेत.

साक्षर समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेमाहितीचे साठे.’ या साठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांचा फायदा घेण्यासाठी सक्षम व्हायचे, तर वाचनावर आणि लेखनावर उत्तम प्रभुत्व हवे. शाळेच्या बहुसंख्य ग्राहकांना, म्हणजे मुलांनाटिकाऊ साक्षरतादेण्यात शालेय व्यवस्था अपयशी ठरत असेल तर त्याला गंभीर स्वरूपाची संख्यात्मक अकार्यक्षमता म्हणावे लागेल. अशा अकार्यक्षमतेला व्यापक असा सामाजिक संदर्भ असतो. आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे असे म्हणायला पुरेशी कारणे आहेत. त्याचे एक लक्षण म्हणजे शाळेच्या सुरुवातीच्याच काळात होणारी गळती. पुढे वापरता येईल एवढा काळ टिकण्यासाठी साक्षरतेची पातळी गाठण्याआधीच बहुसंख्य मुले शाळा सोडतात. जी शाळेत टिकतात, त्यांपैकी अनेकांना वाचलेल्याचा अर्थ समजतोच असे नाही.

वाचनाच्या परिघाचा विचार केला तर वाचनाच्या प्रक्रियांविषयीचे शास्त्रीय ज्ञान जे सुचवते, त्याच्या अगदी विरुद्ध अशा पद्धती वाचन शिकवण्यासाठी आपल्याकडच्या शाळांमध्ये वापरल्या जातात. पहिलीत वाचन शिकवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वसामान्य पद्धती वाचनाच्या आधुनिक संशोधनाच्या संदर्भात पाहिल्या, तर त्या वाचन शिकवण्याच्या पारंपारिक पद्धतींकडे झुकणार्‍या असल्याचे दिसते. थोडक्यात सांगायचे तर लिपी ही वेगवेगळ्या खुणांची गुंतागुंतीची व्यवस्था आहे आणि केवळ त्या खुणा आल्या की झाले, असा हा लिपीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मुलांनी क्रमाक्रमाने अक्षरे शिकायची, मग शब्दांमधील एकेक अक्षर ओळखायचेमुळाक्षरांशी पूर्ण परिचय झाला की मगच ती वाक्यांमध्ये वापरायला परवानगी ! या सगळ्याला खूपच वेळ लागतो. कारण यात यांत्रिक सरावाचे काम मोठ्या प्रमाणात करावे लागते. अशा यांत्रिक कामातून मुलाला समाधान मिळत नाही. त्या कामाचे फळही लगेच मिळत नाही. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुरात काय अर्थ दडला आहे, त्या अर्थाशी आपला संबंध कसा जोडलेला आहे, हे जाणून घेण्याची मुलाची उत्सुकता, या पद्धतीत खूप उशिरा शमते.

सर्वांत आधुनिक संशोधनातून असे लक्षात आले आहे की, वाचनाच्या गाभ्याशी दोन गोष्टी असतात. एक, त्याच्याशी आपले नाते शोधणे आणि दुसरी, अर्थ समजून घेणे. बोलणे, खेळणे, चित्र काढणे या सगळ्या आंतरक्रियांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची चिन्हे वापरली जातात. सलग पुढे पाहात गेले, तर प्रतीके वापरण्याच्या याच धाग्यावर पुढचे टप्पे दिसतात, ते म्हणजे वाचनाची आणि लेखनाची कौशल्ये. मानवी मुलाची संवादात सहभागी होण्याची ओढ या धाग्यात गुंफलेली असते.

शब्द तोडून अक्षरे वाचणारी मुले आणि शब्द शब्द वाचत वाक्य तोडणारी मुले आपल्या प्राथमिक शाळांमध्ये प्रमाणात आहेत. एकंदर समाजातही असे तुटक वाचणार्‍यांची संख्या काही कमी नाही.

अशा पद्धतीने वाचायला शिकणारी काही मुलेही पुढे उत्तम वाचक बनण्याची शक्यता असते, पण त्यामागचे खरे कारण म्हणजेशिक्षक’. एखादा उत्साही, प्रेमळ शिक्षण एखाद्या यांत्रिक कामातही अर्थपूर्णतेचे रंग भरू शकतो. याकरिता शिक्षकाकडे मुलांसाठी भरपूर वेळ असायला हवा. पूर्वी विद्यार्थी मोजके असताना अशी परिस्थिती होती. स्पर्धेचा अभाव, पुरेसा वेळ आणि कमी विद्यार्थी या घटकांमुळे पारंपरिक पद्धतींनीही मुले वाचन चांगल्यापैकी शिकत असत, असे दिसते. तेव्हा समाजातल्या एका विशिष्ट थरातली मुलेच साक्षर होत आणि मग त्यांना समाजाच्या भूतकाळाबाबतचे लिखित ज्ञान खुले होई. ज्यांना शिक्षण मिळते अशांपैकी आपण एक आहोत याची जाणीव असणेच इतके अर्थपूर्ण होते, की जे रोज शिकायचे त्याच्या अर्थपूर्णतेचा विचार शिक्षकांना पदोपदी करावा लागत नसावा, असे मानायला जागा आहे.

याहून सध्याची परिस्थिती फार निराळी आहे. पारंपरिक पद्धतीने वाचनलेखन शिकवत राहणे म्हणजे पुराणपंथी वृत्तीने कालबाह्य गोष्टी कवटाळून ठेवण्यासारखे आहे. औद्योगिक प्रगती आणि त्यासाठी पूरक अशा सामाजिकराजकीय संस्था या समाजातल्या बहुजनांनी साक्षर असण्याची मागणी करणार्‍या आहेत. व्यक्तिगत पातळीवरच्या प्रयत्नांमधून अर्थ शोधण्याची गरज त्यांनी निर्माण केली आहे. शिक्षणाच्या द्वारा व्यक्तिगत पातळीवरच्या अर्थपूर्णतेची भावना अनुभवता यावी यासाठी अमेरिकेपासून रशियापर्यंतच्या देशांनी बालककेंद्री पद्धतींचा शिक्षणात अंगीकार केला. बहुजनसमाजाला शिक्षणासाठी प्रेरित करण्याची आणि परिस्थितीचा अर्थ समजून घेण्यासाठी सक्षम करण्याची ताकद या पद्धतींमध्ये आहे.

औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या गरजांमधून या पद्धतींचा जन्म झाला. औद्योगिक विकासासाठी त्या पूरक आहेत. या पद्धतींमधून साक्षरता सर्वदूर पोहोचते आणि तिचे स्वरूप टिकाऊ असते. माणसाची जगण्याची ओढ टिकण्याशी आणि औद्योगिक प्रगतीमुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीचा अर्थ समजून घेण्याशीही या पद्धतींचा संबंध आहे.

प्रमाण भाषेचा अतिरेकी आग्रह का ?

प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह कशासाठी?

मूल समाजात वाढते. त्याचे पालनपोषण-संगोपन आजूबाजूचे लोक करतात. जगण्याची गरज म्हणजे संवादाचे माध्यम म्हणून मूल भाषा शिकते. मुलांची भाषाक्षमता भोवतालच्या भाषेमुळे कार्यान्वित होत असते. अशा पद्धतीने अनौपचारिक शिकण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्याच्या-त्याच्या भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. ज्या सहजतेनं ते कुटुंबात भाषा शिकते, ती वापरते, त्यात व्यवहार करते, तितक्या नैसर्गिक पद्धतीनं, सहजतेनं मूलं शाळांमधूनही भाषा शिकली पाहिजेत अशी अपेक्षा असते. मग खरोखरच वर्गातून मुलं इतक्या सहज पद्धतीनं भाषा शिकताहेत का? तर अर्थातच याचं उत्तर नाही असे येते. खरे तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच मुलांनी आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविलेले असते. याच भाषेद्वारे मुले स्वत:चे विचार, भावना इतर लोकांपर्यंत पोहोचवित असतात. मग तरीही अपेक्षेप्रमाणे का घडत नाही? त्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत? तर त्याचे एक महत्त्वाचे उत्तर मिळाले ते असे की, प्रमाण भाषेत शिकण्याचा आणि शिकविण्याचा अतिरेकी आग्रह. भाषा बदलत असते. हे अगदी मान्य. पण हे खरे असले तरी पण पाठ्यपुस्तकातले मराठी शिकण्याच्या आग्रहाने खेड्या-पाड्यांतले जिवंत मराठी आपण संपवले आहे. याचा विचार करायला खरेच कोणाला फुरसत नाही, की तो करण्याची गरजच कोणाला वाटत नाहीये? नेमके काय चाललेय हे कळायला मार्ग नाही.

भाषा ग्रहणाची जशी एक जैविक व मानसिक बाजू असते तशीच ती सामाजिक असते. भाषाविज्ञानात काम करणा-या तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, ‘सामाजिक गरज नसती तर मानवाने भाषाशिक्षणाचा प्रयत्नच केला नसता.’ आपले काम साधून घेण्याच्या गरजेतून मूल परिसरात बोलल्या जाणा-या भाषेत व्यवहार करीत शिकत जाते. कोणाशी कसे बोलाचे, कोणाला बरोबरीने वागवायचे, कोणाशी आदरार्थी बोलायचे याचे ज्ञान मुलाला अनुभवातूनच मिळत असते. आज्ञा करताना कसे बोलायचे, हट्ट धरताना कसे बोलायचे, लाडीगोडी लावताना कसे बोलायचे हे सर्व मुले उत्स्फूर्तपणे शिकत असतात. ऐकणे–बोलणे, आंतरक्रियांमधून मुलांची भाषिक प्रगती होत असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर शाळेत येण्यापूर्वीच मुलांचे भाषाशिक्षण विशिष्ट एका टप्प्यावर येवून पोहोचलेले असते.

आपल्या देशात अनेक प्रकारच्या विविधता आहेत. त्यात भाषेबाबत तर खूपच वैविध्य आहे. त्याला कधी सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असतात, तर कधी ऐतिहासिक, भौगोलिक कारणे असतात. त्याला एकूणच समाजाच्या वाटचालीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. भाषाशिक्षणापुरता (म्हणजे प्रथम भाषेपुरताच) मर्यादित विचार करायचा झालं तर नेमकी गडबड कोठे होते, ते आपल्या लक्षात येईल. तर मुद्दा असा की, भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे दिली जाते. भाषा कशी वापरायची, याचे रितीरिवाजदेखील समाजाकडून मिळत असतात. जर का भाषा अभिव्यक्तीचे, संवादाचे माध्यम असेल आणि ती अभिव्यक्ती प्रत्येक मूल स्वत:च्या भाषेत नैसर्गिक रीतीने नीटपणाने करू शकत असेल, तर मग आपण प्रमाणभाषेचा उगीच आग्रह कशासाठी धरतो आहोत? हा खरा प्रश्न आहे. मुले शाळेत येताना आपली ‘बोली’ (घरची भाषा) घेऊन येतात, पण त्यांना शिक्षण घ्यायचे असते ते प्रमाण भाषेत! पहिल्या इयत्तेत येईपर्यंत मूल एका विशिष्ट कौटुंबिक वातावरणात वाढत असते. त्याच्या घरच्या भाषेत त्याचे सारे व्यवहार व्यवस्थितपणे सुरु असतात. म्हणजे भूक लागली, की मागितल्यावर जेवण मिळते. तहान लागली की पाणी. जेव्हा मुलाला बोलता येत नसते तेव्हाही मुल भ्षेचा वापर करते. म्हणजे आई घराबाहेर जायला निघाल्यावर आईसोबत जायचे असेल तर मुल भोकाड पसरते म्हणजे मागे लागते…असे सगळे तिकडे सुरु असते. कोणत्याही मुलाच्या भाषाशिक्षणास अगदी लहान वयात म्हणजे काही दिवसांतच सुरुवात होते. मुख्य म्हणजे अनौपचारिकपणे जगण्यात प्रमाणभाषेवाचून कोणाचे काहीच अडत नाही. उलट त्यांना स्वतःचे म्हणणे स्वतःच्या भाषेतून अधिक प्रभावीपणे मांडता येते. ग्रामीण मराठीमधील काही वाक्ये पहा- १. लई मज्जा केली २. जत्रेत मोक्कार फिरलो. ३. लई भारी पिच्चर व्हता रे. ४. मपली माय बाजाराला गेल्ती… भाजीऐवजी कोरड्यास किंवा कालवण, माझ्या-तुझ्याऐवजी माह्या-तुह्या. असे अनेक शब्द आजही ग्रामीण भागात सर्रास वापरले जातात. किंबहुना आईपेक्षा माय हा शब्द अधिक माया घेऊन येतो. जवळकीच्या नात्याची साक्ष देतो. त्याला एक आपलेपणाच्या ओलाव्याची ‘शेड'(shade) असते. शाळेतल्या पुस्तकात त्यांना हे शब्द कुठेच भेटत नाहीत. मग अशा मुलांना न्यूनगंड छळायला लागतो. याला कारण म्हणजे शाळेत पाय ठेवल्यापासून प्रमाणभाषेचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसते. आधीच शाळा, खोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेतील मुले हे सारे त्या मुलांच्या दृष्टीने नवे, वेगळे जग असते. आजवर दिवसभर मोकळ्या वातावरणात मस्त हुंदडणा-या मुलांना हे जग समजून घेणे आधीच जड जाते. आधीच या औपचारिक रीतीने शिकताना पाठ्यपुस्तके किंवा शाळेतल्या शिक्षणातून मुलांचे जगणे हरवलेले असते. मुलांचे सांस्कृतिक भांडवल आणि शिकणे याचा मेळ आपण कुठे घातलेला नाही. प्रमाणभाषेच्या अडथळ्यामुळे स्वत:च्या भाषेतून साकारणारे त्याचे विश्व आणि शाळेत जे सुरू असते, त्याचा सांधा कुठे जुळत नाही. ब-याचदा असा विचित्र अनुभव येतो की मुलांना निबंधलेखानासाठी ग्रामीण जीवनावरचे विषय दिले जातात. परंतु खेदाची गोष्ट अशी की, त्या निबंधाला ग्रामीणतेचा अजिबातही वास येत नाही. पाठ्यपुस्तकी भाषेत लिहिण्याच्या संस्कारामुळे मुले नीट व्यक्त होवू शकत नाहीत. म्हणूनच मग त्यांचे जगणे, बोलणे, निरीक्षणं, लकबी, भाषा हे कुठेच आढळत नाही. मग स्वत:ची आई लिहिण्यापेक्षा मुलं सोप्पा पर्याय निवडतात. रेडीमेड निबंध लिहून काढतात. मग होते असे की, ‘नवनीत’ची आई सा-यांचीच आई होते! आपण लेखन शिकवतो ना? मग मुले ‘लिहू’ का शकत नाहीत? मुले आपले मनातले विचार कागदावर उतरून काढू शकत नाही कारण की, आपल्या भाषेला प्रतिष्ठा नाही हे ग्रामीण,आदिवासी मुलांच्या मनावर बिंबविण्यात सध्याच्या व्यवस्थेला पुरेपूर यश आलेय! दुसरीकडे प्रमाणभाषा त्यांना जवळची वाटत नाही. तिच्याविषयी असेल तर त्यांच्या मनात भीतीच आहे.

इंग्रज येण्यापूर्वी शहरवासियांची मुळे गावाच्या मातीत खोलवर रुतलेली असत. शहरी भाषेला खेड्यातल्या मातीचा ताजा वास असे. म्हणजे मुंबईत वेगवेगळ्या भागातून चाकरमाने आले, पण त्यांची भाषा त्यांनी सोडली नाही. म्हणूनच मग मालवणी, घाटी असे लोक पटकन ओळखले जात. पण पुढच्या काळात आपण मातृभषा नाकारून इंग्रजीचे महत्त्व इतके वाढविलेय की, विचारायलाच नको. पुस्तकातली प्रतिज्ञा म्हणताना तेवढे आपण विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा आदर करतो. पण आजही आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे कामकाज केवळ इंग्लीशमधुनच चालते. संसदेतही हिंदी-इंग्लीशमध्येच बोलावे लागते. ‘युनायटेड नेशन’मध्ये जर सर्व भाषात कामकाज चालते. पण दहा कोटी लोक मराठी बोलतात आणि जगभरातला पहिल्या विसातला भाषिक समूह असूनही तिची दखल येथे कोणी घेत नाही. (तेच तेलगु, तमिळ, मल्याळीचेही.) आजवर या गोष्टीमुळे कित्येक बोली मेल्या. आणखीन काही रोज मरताहेत. मातृभाषा असलेल्या मराठीपुढे आता अस्तित्वाचे आव्हान उभे ठाकलेय. अलीकडे तर मराठी तरुण पिढी मोठ्या प्रमाणवर टेक्नोसॅव्ही होताना दिसतेय. थेट इंग्लिशमधून त्यांचा पत्रव्यवहार सुरु असतो. बोलण्यातही दर वाक्यात इंग्लिश शब्द येतो म्हणजे येतोच. माहिती तंत्रज्ञानामुळे त्यामागून येणा-या डीजिटल सोसायटीमुळे जर का मराठी संगणकातून हद्दपार झाली तर पुढच्या काळात मराठी नेमकी कुठे असेल? असा प्रश्न साहजिकच पडतो.

अजून एक गोष्ट. भाषा शिक्षणाचे मुळात उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक समायोजन आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास. आपल्याकडे प्रमाणभाषा शिकविली जाते, ती ‘बोलीभाषे’ला पर्याय म्हणून किंवा तिची जागा घेण्याच्या हेतूने, तीदेखील एका सुरात, एका लयीत, एका तालात! वर्गाबाहेरच्या भाषिक विविधतेचा काडीचाही विचार न करता. अत्यंत निरस आणि रुक्ष पद्धतीने. याचा मुलांना भारी त्रास होतो. ब्राह्मणीकरणाची मोठी छाप पाठ्यपुस्कांवर दिसून येत असल्याने अर्थातच ग्रामीण, दलित, आदिवासी मुलांसाठी शिकणे आव्हानात्मक होवून बसते. आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या उंबरठ्यावरून पाउल आत टाकतानाच बिचाऱ्या मुलांना तो आघात सहन करावा लागतो, हे सर्वात वाईट. हजारो लोक बोलतात ती शिक्षणाची भाषा का ठरू शकत नाही? उदाहरणार्थ, आसाम राज्यात राजवंशी भाषा बोलणारे हजारो लोक आहे पण या भाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा उघडलेली नाही. इतक्या लांब जाण्याची गरजच नाही- आपल्या राज्यात कोकणा, भिली, पावरा, गोंडी, माडिया या भाषांचा प्रमाण मराठीशी काय संबंध आहे? सांगा ना. केवळ महाराष्ट्रात राहतात म्हणून त्यांचीही ‘मातृभाषा’ मराठी? आणि मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत बोलते ती भाषा असा अर्थ आपण लावितच नाही.

जगभरात सुमारे ५००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात, तर ७०० पेक्षा जास्त भिन्न सांस्कृतिक समूह आहेत. भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात तर मोठ्या प्रमाणावर बहुभाषिकता आढळून येते. १९६१ च्या पाहणीनुसार भारतात १६५२ भाषा नोंदवल्या आहेत. (अलीकडची आकडेवारी मिळू शकलीनाही.) आपल्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर केवळ आदिवासींमध्ये ७४ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, असे संशोधन आदिवासी संस्कृतीचे संशोधक गोविंद गारे यांनी केले आहे. जर १० मैलांवर भाषा बदलते, असे केवळ म्हटले जाते. एकट्या महाराष्ट्रात तब्बल २५० प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आणि हो, या भाषांना ‘बोली’ असे हटकून संबोधले जाते. शाळेत येणारी मुले आणि न येणारी मुले यांचे संवाद पुस्तकात दिले जातात. त्यातून हिनविण्याचे प्रकार सुरु असतात. त्यामागेही भाषेचे राजकारण असते. कारण की भाषा एक सत्ता असते. जिथे तिथे सत्तेच्या भाषेलाच प्रतिष्ठा मिळत राहते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असा भेदाभेद मुद्दामहून केला जातो. प्रमाणभाषा म्हणून मानलेली मराठी ही प्रमाणभाषा नसून एक बोलीच आहे. हे कसे विसरता येईल?

पण लक्षात कोण घेतो? पण लक्षात कोण घेतो? पण लक्षात कोण घेतो? राजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या आणि एकोणिसाव्या शतकापासून शिक्षणात पुढारलेल्या आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा असणाऱ्या पुणे व मुंबई येथील विशिष्ट वर्गाची भाषा हळूहळू प्रमाण मराठी बनली. त्यातून ब्राह्मणी-ब्राह्मणेतर असा भेद मराठी भाषेत अगदीच स्पष्टपणाने दिसून येतो. प्राचीन काळापासून शिक्षणाची मक्तेदारी असल्यामुळे आणि त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक वर्चस्वामुळे ‘ब्राह्मणी बोली’ मराठी प्रमाणभाषा बनली. पुढे शिक्षणातील माध्यम आणि साहित्यातील वापर यामुळे स्थिरावली. वास्तविक प्रमाणभाषा ही पूर्णपणे कृत्रीम असते. ती मुद्दाम शिकावी लागते. आणि आणखीन एक भाषेत असे प्रमाण वैगरे काही नसते असे भाषातज्ज्ञ सांगतात. मराठीचे जे वेगवेगळे प्रकार बोलले जातात, त्यांना वेगवेगळे पैलू आहेत, शैलीचा नैसर्गिक विशेष आहे. परंतु त्या भाषा नव्हे तर बोली आहेत, अशी हेटाळणी केली जाते. बोलीभाषा ह्या अशुद्ध, त्या केवळ गांवढळ, अडाणी लोकांनीच बोलायच्या असतात. अशी प्रस्थापित व्यवस्थेच्या मनात अढी दिसते. वास्तविक स्वत:ची भाषा मरणे म्हणजे दलित आणि आदिवासी समूहातील लोकांचे जगाला समजून घेण्याच्या महत्त्वपूर्ण विशेषतत्वाचे नुकसान होतेय.

तात्पर्य, या भेदभावामुळे वास्तव जीवनीतील भाषाविविधतेचा विचार न करता प्रमाणभाषा माथी मारल्यामुळे दलित, ग्रामीण, आदिवासी मुले शिक्षणात मागे पडताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे चांगली बौद्धिक क्षमता व कुवत असतानादेखील केवळ भाषाविषयक दुराग्रहामुळे हे सारे घडते आहे, याचे जास्त वाईट वाटते. अमुक एक भाषा शुद्ध आणि अमुक एक भाषा अशुद्ध असे काही नसते, असे भाषाविज्ञानाचे अभ्यासक सांगतात. त्याचे कारण म्हणजे व्याकरणिक संकल्पना या भाषेच्या आधी नसतात, त्या मागून भाषेवर लादल्या जातात. व्याकरणाच्या आणि प्रमाण भाषेचा आग्रह धरणाऱ्या आणि त्याचा बागुलबुवा करणाऱ्या मंडळीना हे जर का लवकर समजले, उमजले तर तो आदिवासी-दलित मुलांच्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाचा दिवस असेल. परंतु एकूणच यासाठी अधिकाधिक व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सर्वात आधी ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ नुसार शिक्षण मुलांच्या जीवनाची जोडताना त्याचे संदर्भीकरण करण्याची तातडीची गरज आहे. पाठ्यपुस्तकांचे अध्यापन म्हणजे भाषेचे आणि व्याकरणाचे अध्यापन हा गैरसमज भाषाशिक्षणातील सर्वात मोठा अडसर आहे, या पारंपरिक गैरसमजूतीला छेद दिला पाहिजे.

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा रास्त आग्रह धरला जातो. परंतु येथे मातृभाषेची सुस्पष्ट व्याख्या केली पाहिजे. मूल ग्रहणकाळात आत्मसात करते ती मातृभाषा मानली तर ती बहुधा ‘बोली’च्या स्वरुपात असते. तांत्रिक गोष्टींचा बाऊ करून आज बोलीमध्ये किंवा त्याच्या भाषेच्या प्रकारात (काही इयत्तांपर्यंत का होईना) शिक्षण देण्याचे व्यवस्थेने सोयीस्कररीत्या नाकारले आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे अर्थातच हा एका व्यापक राजकारणाचा एक भाग असला पाहिजे. परंतु किमान शिक्षणाची सुरुवात करताना तरी ‘बोली’ आणि प्रमाणभाषा अशा दोन्हींचाही अवलंब केल्यास त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही हित आहे. त्यातून मुलांचे शिक्षण अधिक आनंददायी होईल. भाषा जोडणारी असावी, शिक्षणापासून तोडणारी नको. मुलांच्या भाषेचा आदर केल्यास शिक्षण त्यांच्या जीवनाशी जोडले जाईल. त्यांच्या अनुभवविश्वाशी नाते सांगू लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक विविधता असलेली मुले प्रमाणभाषेच्या आग्रहामुळे कायम न्युनगंडाने पछाडलेली दिसतात. कायमच दडपणाखाली राहतात. शाळेने म्हणजे एकूणच व्यवस्थेने मुलांची भाषा समजून घेतल्यास मूलं शाळेपासून दूर जाणार नाही. ती शाळेत येतील, रमतील, टिकतील, शिकतील, पुढे जातील. ती संधी आपण मुलांना व्यवस्था म्हणून उपलब्ध करून दिली पाहिजे, किंबुहना ती आपली जबाबदारीच आहे. आज जे काही भषा शिकविणे म्हणजे व्याकरण शिकविणे हे सारे सुरु आहे ते मुलांना नावूमेद करणारे वाटतेय. प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह मुलांच्या शिक्षणातील महत्त्वाचा अडसर ठरतो आहे. विलियम हल या भाषातज्ज्ञाने म्हटलेच आहे ना की “जर आपण मुलांना बोलायचे शिकवले असते, तर ते कधीच नीट बोलायला शिकले नसते.” यात सारे काही आले.

आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून द्यायचा हा की, आपल्याकडील पुरुषी वर्चस्वाच्या समाजाचे प्रतिबिंब भाषेतही पडल्याचे दिसते. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष, राष्ट्रपिता यांसारखे शब्द पुरुषप्रधानता अधोरेखित करतात. राष्ट्रपतीसारखा शब्द तर पुरुषवाचक आहेच, परंतु एखादी स्री राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल न करता हा शब्द तसाच वापरला जातो. गुरुजी, डॉक्टर, शास्रज्ञ, दुकानदार, वकील हे आणखी काही पुरुषवाचक शब्द सांगता येतील. माणसाची वृत्ती त्याच्या भाषेत प्रतिबिंबित होते, याची ही वानगीदखल काही उदाहरणे दिली. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगता येतील पुरुषी वर्चस्व असलेली भाषा अशी इंग्रजी भाषेवर जोरदार टीका झाल्याने अलीकडच्या काळात इंग्रजीत काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, लग्नावरून स्रीला Mrविवाहित(mrs.) आणि Missअविवाहित(miss) असे शब्द वापरण्याऐवजी श्रीमती Ms(ms) असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. असे प्रयत्न मराठी भाषेत झाल्यास लिंग समभावाच्या दृष्टीने त्याची चांगली मदत होऊ शकेल. मग आपल्या प्रतिज्ञेमधील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ असे पुरुषवाचक उल्लेख वगळण्यापासून पाठ्यपुस्तकांतील अभिजन वर्गाच्या भाषेची छाप पुसून, आशयामधील सुधारणेला मोठा वाव आहे. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडा, असे खूप बोलले जाते. तसे ते खरोखरच जोडायचे असेल तर त्याची सुरुवात भाषेपासून करायला हवी. आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून द्यायचा हा की, आपल्याकडील पुरुषी वर्चस्वाच्या समाजाचे प्रतिबिंब भाषेतही पडल्याचे दिसते. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष, राष्ट्रपिता यांसारखे शब्द पुरुषप्रधानता अधोरेखित करतात. राष्ट्रपतीसारखा शब्द तर पुरुषवाचक आहेच, परंतु एखादी स्री राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल न करता हा शब्द तसाच वापरला जातो. गुरुजी, डॉक्टर, शास्रज्ञ, दुकानदार, वकील हे आणखी काही पुरुषवाचक शब्द सांगता येतील. माणसाची वृत्ती त्याच्या भाषेत प्रतिबिंबित होते, याची ही वानगीदखल काही उदाहरणे दिली. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगता येतील पुरुषी वर्चस्व असलेली भाषा अशी इंग्रजी भाषेवर जोरदार टीका झाल्याने अलीकडच्या काळात इंग्रजीत काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, लग्नावरून स्रीला Mrविवाहित(mrs.) आणि Missअविवाहित(miss) असे शब्द वापरण्याऐवजी श्रीमती Ms(ms) असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. असे प्रयत्न मराठी भाषेत झाल्यास लिंग समभावाच्या दृष्टीने त्याची चांगली मदत होऊ शकेल. मग आपल्या प्रतिज्ञेमधील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ असे पुरुषवाचक उल्लेख वगळण्यापासून पाठ्यपुस्तकांतील अभिजन वर्गाच्या भाषेची छाप पुसून, आशयामधील सुधारणेला मोठा वाव आहे. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडा, असे खूप बोलले जाते. तसे ते खरोखरच जोडायचे असेल तर त्याची सुरुवात भाषेपासून करायला हवी.

सौजन्य QUEST